उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम-जोंग उन कोमात…

उत्तर कोरिया, २४ ऑगस्ट २०२०: उत्तर कोरियाचा हुकूमशहा आणि जगातील सर्वात चर्चेत असलेले व्यक्तिमत्व म्हणजे किम-जोंग उन यांचे विषयी पुन्हा एक खळबळजनक वृत्त समोर आलं आहे. किम जोंग उन कोमात असल्याचं आता सांगितलं जात आहे. याआधी एप्रिलमध्ये अमेरिकन गुप्तचर यंत्रणांनी किम जोंग यांची यापूर्वी हृदयविकाराची शस्त्रक्रिया झाली होती. मात्र, ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली नाही, असं वृत्त दिलं होतं.

डेली मेलच्या वृत्तानुसार, दक्षिण कोरियाचे माजी गुप्तचर अधिकारी चांग सोंग मिन यांनी स्थानिक माध्यमांशी बोलताना सांगितले की, किम कोमामध्ये आहेत, पण, ते जिवंत आहेत. सध्या किंम जोंग यांची बहिण किम यो जोंग हिच्याकडे सर्व अधिकार देण्यात आले आहेत. किम हे ३६ वर्षांचे असून २०११ पासून ते उत्तर कोरियाचे हुकूमशहा आहेत.

मिन यांनी यापूर्वी दक्षिण कोरियाचे माजी राष्ट्राध्यक्ष किम देई जुंग यांच्यासोबत त्यांचे विशेष सहाय्यक म्हणूनही काम केलं आहे. सत्ता सांभाळण्याची किम यो जोंग यांची पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी किम जोंग उन यांच्यासोबत काम केलं आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा