४ लाख नव्हे तर आता ४० लाख ट्रॅक्टरची रॅली: राकेश टिकैट

नवी दिल्ली, १० फेब्रुवरी २०२१: भारतीय शेतकरी संघटनेचे (बीकेयू) नेते राकेश टिकैत यांनी कुरुक्षेत्राच्या पिहोवा येथे मंगळवारी पुकारलेल्या किसान महापंचायतीत शेतकऱ्यांना संबोधित करताना ते म्हणाले की, आंदोलन आता पुढे जाईल आणि ते देशभर पसरले जाईल. तसेच ४ लाख ऐवजी आता ४० लाख ट्रॅक्टरची रॅली करण्यात येईल.

महापंचायतीत राकेश टिकैत यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवित ते म्हणाले की, आता हे आंदोलन पुढे सुरूच राहिल आणि देशभर पसरले जाईल. ४ लाख नव्हे तर आता ४० लाख ट्रॅक्टरची रॅली काढली जाईल.

यावेळी राकेश टिकैत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवेदनावर निशाणा साधला की, त्यांनी आयुष्यात कधीच आंदोलन केले नाही, परंतु त्यांनी देश तोडण्याचे काम केले आहे, त्यामुळे त्यांना आंदोलन करणाऱ्या आंदोलकांविषयी काय माहिती असणार आहे. ते म्हणाले की, आंदोलन शहीद भगतसिंग यांनी केले आहे. अगदी लालकृष्ण अडवाणींनी आंदोलन केले आहे, परंतु पंतप्रधान मोदींनी कधीच आंदोलन केले नाही.

हरियाणा मध्ये पंचायत करण्यास मनाई आहे का?: राकेश टिकैट

शेतकरी आंदोलनासंदर्भात शेतकरी नेते राकेश टिकैट म्हणाले की, २ ऑक्टोबरपर्यंत शेतकरी आंदोलन सुरूच राहिल, परंतु त्यानंतरही आंदोलन थांबणार नाही, आता शेतकरी चळवळीच्या ठिकाणी पोहोचू शकतील. चळवळीची पातळी आता देशव्यापी असेल.

राकेश टिकैत यांना जेव्हा हरियाणामध्ये सातत्याने किसान पंचायत का केली जाते असे विचारले असता त्यांनी उत्तर दिले की हरियाणा मध्ये पंचायत करण्यास मनाई आहे का?

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा