शरद पवारांबद्दल एकही अपशब्द वापरला नाही, दिलगिरी व्यक्त करतो, केसरकारांचं वक्तव्य

मुंबई, १५ जुलै २०२२: जितेंद्र आव्हाडांनी केसरकर यांच्यावर ट्विट करून टीका केली होती. पवारांवर अपशब्द वापरला असा आरोप त्यांनी केला होता. या नंतर आता केसरकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी या बाबत दिलगिरी देखील व्यक्त केली.

ते म्हणाले की, माझ्या जीवनातील जडणीघडणीमध्ये ज्या नेत्यांचा हात आहे त्यांपैकी एक शरद पवार आहेत. त्यांच्या बद्दल एकही अपशब्द माझ्या तोंडातून येऊ शकत नाही. शिवसेने मध्ये जी फूट पडली त्यावर मी वक्त्यव्य केलं होतं ती एक वस्तुस्थिती होती. त्या वस्तूस्थितीचा मी उल्लेख केला. २०१४ ला ज्या आम्ही वेगवेगळ्या निवडणूक लढवल्या होत्या त्यावेळी जे भाजप च सरकार स्थापन झालं होतं त्यावेळी पवार साहेबांनी आपली भूमिका जाहीर केली होती. त्यावेळी पवार साहेबांनी भाजपाला बिनविरोध पाठिंबा दिला होता. त्याकाळामध्येही शिवसेनेची बार्गेनिंग पावर कमी झाली होती. या घडलेल्या घटना आहेत. त्यामुळं त्या घटनांविषयी काहीतरी चुकीचं वक्त्यव्य करू नये. शरद पवार हे महाराष्ट्राचे जेष्ठ नेते आहेत. त्यांच्या विषयी सगळ्यांच्या मनात आदर आहे. त्यामुळं माझ्या कडून त्यांच्या विषयी कोणतही चुकीचं वक्त्यव्य येणार नाही. जर त्यांच्या विषयी माझ्या तोंडून एकही शब्द चुकीचा निघाला असेल तर मी त्या विषयी जाहीर दिलगिरी व्यक्त करतो.

आव्हाडांना उत्तर

आव्हाड मला भेटायला आले होते हे मला मान्य आहे. पण ते जेव्हा मला भेटायला हेलिकॉप्टर ने आले होते तेव्हा नारायण राणेंच्या मुलाचा प्रचार करा असा निरोप घेऊन ते आले होते. पवार साहेबांचा कोणताही निरोप घेऊन आले नव्हते. पवार साहेब ज्या दिवशी सावंत वाडीला आले होते त्या दिवशी ते येतील मला अपेक्षा नव्हती. मी माझ्या मतदार संघात होतो. ते जेव्हा माझ्या मतदार संघात आले तेव्हा मी त्यांना माझा राजीनामा दिला. तो राजीनामाही अतिशय नम्र होता. त्यावेळी त्यांनी तो राजीनामा स्वीकारला नाही. त्यांनी तो राजीनामा स्वतः जवळ ठेऊन घेतला. त्या नंतर ते जेव्हा सिंधुदुर्ग मध्ये आले होते तेव्हा राष्ट्रवादीची एक मोठी सभा होती. तेव्हा मला स्टेजवर बोलवू नका असा निरोप आव्हाड माझ्याकडं घेऊन आले. पण असा निरोप पवार साहेब देऊ शकत नाही. त्यानंतर मी राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय घेतला.

पवार साहेबांविषयी मला आदर आहे. मी जाहीर पणे दिलगिरी व्यक्त करत आहे. एवढच नाही तर मी पवार साहेबांच्या घरी जाऊन देखील दिलगिरी व्यक्त करू शकतो. मी शिवसेनेला आव्हान केलं होतं. त्या आव्हानाला त्यांनी कसा प्रतिसाद द्यावा हा त्यांचा प्रश्न आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा