दूधगंगेतून एक थेंबही पाणी देणार नाही – राजगोंडा पाटील

6

इचलकरंजी, १ जून २०२३ : इचलकरंजी महापालिकेचे माजी नगरसेवक पाणीपुरवठा सभापती विठ्ठल चोपडे यांनी दूधगंगा डाव्या कालव्यामधून घोसरवाडपासून तीन किलोमीटर बंद जलवाहिनीतून घोसरवाड येथील दूधगंगा नदीमध्ये पाणी सोडावे. असे केल्यास शिरोळ तालुक्यातील घोसरवाड, दत्तवाड, टाकळीवाडी, टाकळी, दानवाड या पाच गावांना उन्हाळ्यात भेडसावणारा पाणी प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघणार आहे.

दूधगंगा नदीचा पाणी प्रश्न हा फक्त पाच गावांचा नसून नऊ गावांच्या पिण्याच्या पाण्यासह शेतकऱ्यांच्या शेतीसाठीचा मोठा प्रश्न आहे. यावर्षी उन्हाळ्यात दूधगंगा नदी काही काळ वगळता कोरडीच राहिली आहे. पाण्याअभावी शेतकऱ्यांची पिके वाळून गेली आहेत. हक्काचं सोयाबीनचे पीक ही करता आलं नाही. तसेच बाराही महिने वाहणारी नदी उशाला असून पिण्याचा पाण्याचाही मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

दूधगंगेतून सूळकूड अथवा अन्य कुठूनही पाणी कुठेही देणार नाही या मतांवर दूधगंगा बचाव कृती समिती सह या नऊ गावातील ग्रामस्थ शेतकरी ठाम आहेत. व ठामच राहतील अशी ठोस भूमिका इचलकरंजी महापालिकेचे माजी नगरसेवक राजगोंडा पाटील यांनी व्यक्त केली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा