कायद्यालाही न जुमानणारी हवस…

पुणे,२५ जुलै २०२० : १६ डिसेंबर २०१२ ती रात्र भारतीय इतिहासातील सर्वात काळी रात्र होती. एका निर्भयाच्या देहाचे चालत्या बस मधे काही राक्षस प्रवृत्तीचे नराधम लचके तोडत होते आणि या घटनेनं भारतातील न्याय व्यवस्थेला खडबडून जागे केलं. संपूर्ण देश हा निर्भयासाठी रस्त्यावर उतरला खरे पण , त्यांनतर देखील या लढ्याला ७ वर्षानंतर म्हणजे २० मार्च २०२० मधे पहाटे ५:३० वाजता न्याय मिळाला. त्या नरधमांना ७ वर्षानंतर फाशी देण्यात आली.

मन हेलावून टाकणाऱ्या या घटनेनंतर देशात किती बदल झाला? तर काहीच नाही. आजही बलात्कारा सारखे आपराध दिवसाला देशाच्या कुठल्या ना कुठल्या कोपऱ्यात घडत आहेतच आणि आरोपींना काय तर शिक्षेसाठी ७, ८ वर्षाचा कालावधी लागतो ज्यामधे तोपर्यंत तो कायद्याच्या जोरावर तिकड्म लावतो आणि सुटतो. हे भारतीय न्याय व्यवस्थेचं दुर्दैवच.

गेल्या काही आठवड्या पासून या महामारीच्या काळात देखील अशा घटना समोर आल्या होत्या. पनवेलच्या क्वांरन्टाईन सेंटरमध्ये मुलीवर विनयभंग झाला होता तर पुण्यात बापच राक्षस बनला होता. या घटना ताज्या असतानाच राजधानी दिल्लीमध्ये ह्रदय पिळवळून टाकणारी घटना घडली आहे तर दुसरी कडे धारावीमध्ये देखील माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे.

दिल्लीत क्वांरनटाईन सेंटर मध्ये बलात्कार…..

दिल्ली मधील सर्वात मोठे असलेले कोव्हीड सेंटर सरदार पटेल येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार घडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पिडिता रात्री उठून वाॅशरुमला जात असताना हा प्रकार घडला.१९ वर्षीय या तरुणीवर एका नराधमाने आत्याचार केले आणि त्याच्या एका सहकाराने त्याचा व्हिडियो शुट केला. सदर घडलेला प्रकार १५ तारखेचा आहे तो आत्ता समोर आला असून दोन्ही नराधमाच्या मुसक्या पोलिसांनीं आवळल्या आहेत.

धारावीत ८ वर्षाच्या मुलावर लैंगिक आत्याचार….

अशा नालायक विकृतीच्या नराधमांचे शिकार या फक्त मुलीच होत नाहीत तर काही अल्पवयीन मुले देखील यांचे शिकार होत आहेत. धारावीत अशीच विकृती समोर आली आहे. एका २५ वर्षाच्या तरुणाने ८ वर्षाच्या मुलावर लैंगिक आत्याचार केला. आरोपीने मुलाला पैशाचे आणि खेळण्याचे आमिष दाखवून त्याला मंदिरानजीक घेऊन गेला आणि त्याच्यावर लैंगिक आत्याचार केलें. हि घटना धारावीतील मरिआम्मा मंदिराजवळ घडली. तसेच या प्रकरणी पोलिसांत तक्रार केली असून नराधमाला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. तर घडल्या प्रकारामुळे संपुर्ण परिसरात खळबळ माजली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

एक प्रतिक्रिया

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा