राज्य सरकार नाही तर विरोधी पक्षात अस्थिरता – बच्चू कडू

मुंबई, १ ऑगस्ट २०२० : देवेंद्र फडणवीस यांनी हल्ली सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. त्या बरोबरच शुक्रवारी त्यांनी राज्यात असलेले आघाडी सरकार हे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असल्याचे म्हणत, ते कधी ना कधी तर पडणार आणि त्या नंतर आम्ही धुरा संभाळू असे वक्तव्य केले होते. आघाडी सरकावर टिका केल्यानंतर बच्चू कडू यांनी फडणवीसांवर घणघणाती टिका केली आहे.

राज्यमंत्री बच्चू कडू काय म्हणाले...

राज्यमंत्री बच्चू कडू यांनी फडणवींस यांच्यावर टिका करत “राज्याचे सरकार स्थिर असून विरोधी पक्षच अस्थिर आहे. ज्या दिवशी फडणवींस हे एक सक्षम विरोधी पक्ष नेते म्हणून बोलून दाखवतील त्याच दिवशी त्यांच्या पक्षातील फुटणा-या ४० आमदारांची यादी आम्ही जारी करु असे ते म्हणाले”.बच्चू कडू यांच्या ह्या विधानामुळे राजकिय क्षेत्रात खळबळ माजली आहे.

लगीनघाई बायको मिळेना….

औंरगाबादच्या परिषदमध्ये बोलताना प्रकाश अंबेडकर यांनी विरोधी पक्षाला चिमटा काढला आहे.”भाजपाला लग्न करण्याची घाई झालीय,त्यांना बायको हवीयं पण ती भेटत नाही” अशा शब्दात त्यांनी टिका केली. म्हणजे भाजपाला राज्यात सत्तेत येण्याची घाई झाली आहे,तर त्यांना जोडीदार मिळेना असे ते म्हणाले.

भाजपाची नुकतीच कार्यकरिणीची बैठक हि पार पडली तेव्हा भाजपाने ‘ एक ला चलो रे ‘ चा नारा संपुर्ण कार्यकर्त्यांना दिला.तर चंद्रकांत पाटील यांनी कोणी जर नावावरुन टिका केली तर त्यांचा आता सुड घ्या अशी प्रतिक्रिया दिली होती. पण या नंतर देखील सरकारच्या कामावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवींस हे सारखेच ताशेरे ओढताना दिसत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा