नागपूर, दि. १७ जुलै २०२०: कोरोनामुळे अनेकांचे हाल होताना दिसत आहे तर याचा उपयोगही प्रत्येक जण आपली शक्कल लढवत काहीतरी सोय करुन घेतोय. मात्र या सर्वांमधे प्रेम करणाऱ्या युगलांची या लाॅकडाऊन मधे चांगलीच परवड होताना दिसत आहे. मात्र ऐकतील ते प्रेमी कसले. असाच एक किस्सा समोर आला आहे तो, नागपूरच्या क्वांरनटाईन सेंटर मधून.
तर याची हकीकत अशी आहे की कोरोना सदृश्य लक्षणं असलेल्या नागपुरातील एका महिला पोलीस कॉन्स्टेबलने आपल्याला क्वारंटाईन सेंटरमध्ये प्रेम-विरह सहन करावा लागू नये म्हणून प्रियकराचे नाव चक्क नवरा म्हणून नोंदवले. यानंतर तिच्या त्या ‘कथित’ नवऱ्याला तिच्यासोबत क्वारंटाईन करण्यात आले. मात्र महिला कॉन्स्टेबलसोबत क्वारंटाईन असलेला तिचा ‘तो’ प्रियकर विवाहित होता आणि त्याची पत्नी क्वारंटाईन व विवाहबाह्य या संबंधांबाबत अनभिज्ञ होती.
गेले ३ दिवस नवरा घरी आला नाही म्हणून तिने त्याची मित्र मंडळी नातेवाईकांकडे चौकशी करण्यास सुरूवात केली असता नवऱ्याचे हे पितळ उघडे पडले. हे कळताच तिने तडक पणे क्वांरनटाईन सेंटर गाठले पण तिथे सुरक्षा कारणा अभावी आत जाण्यास मनाई करण्यात आली . त्यानंतर तिने पोलिस स्टेशन गाठून घडलेला प्रकार आयुक्तांंना सांगितला.
यानंतर आयुक्तांनी सदर प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आसून हे प्रकरण समोर येताच आता ‘त्या’ पुरुषास एका वेगळ्या क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आलं असून पुढील तपास सुरु आहे.
ते म्हणतात ना प्रेमात सगळे जायज असते, पण इतके?असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. प्रशासन कोरोनाला रोखण्यासाठी युद्ध पातळीवर काम करत आहे. त्यात क्वांरनटाईन झालेली महीला काॅन्टेबल ही कोविड १९ योद्धा असून ती एक प्रशासकीय अधिकारी आहे आणि त्यांनीच असे कृत्य केले तर मग सर्वसामान्यांनी काय करायचे?
न्यूज अनकट प्रतिनिधी