बारामती, १५ ऑक्टोबर २०२०: बारामती येथील मदरसा दारूल ऊलूम मौलाना युनूसीयामध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते सोहेल शेख (बागवान) यांनी दाखल केलेल्या रीट पिटीशन नुसार सर्व ट्रस्टींना मा.उच्च न्यायालयाने नोटीस बजाविण्यात आल्या आहेत.
बारामती येथील मदरश्याचे ट्रस्टी मुबारक हसनभाई तांबोळी (अध्यक्ष), आखलाक बशीर बागवान (उपाध्यक्ष), सलिम फकीर बागवान (सेक्रटरी), आसिफ जाफर बागवान, शाकीर अब्दुलकरिम बागवान, इस्माईल महमंद तांबोळी, हमजु इस्माईल शेख, अमीर महमंद मुलाणी, राजुभाई लतीफ बागवान, मुस्ताक लतीफ बागवान, शब्बीर रज्जाकभाई तांबाळी, जब्बार शब्बीर पठाण, अलताफ उर्फ पप्पू सरदार पठाण, सलिम दस्तगीर बागवान, आलताफ उर्फ पप्पू पटेल यांच्यासह महाराष्ट्र सरकार, प्रिन्सिपल सेक्रटरी, मायनॉरिटी डेव्हलपमेंट महाराष्ट्र, जॉईट चॅरिटी कमिशनर, पुणे, व चिफ एक्सिक्युटीव्ह ऑफीसर, वक्फ बोर्ड औरंगाबाद यांना उच्च न्यायालये नोटीस बजावली आहे.
मदरसा १८ वर्षांपासून बारामती येथे सुरू आहे. मदरसामध्ये सोहेल शेख(बागवान) हे नेहमी रोख रक्कम निधी स्वरूपात देत असत, मात्र मदरसामध्ये अनेक आर्थिक गैरव्यवहार होत आहे. लक्षात आल्यावर सोहेल शेख (बागवान) यांनी मुंबई येथील उच्च न्यायालय यांचेकडे रिट पिटीशन दाखल केले आहे. याची सखोल माहिती घेत न्यायाधीश आर.डी. धनुका व जस्टीस महादेव जे. जामदार यांनी सुनावणी झाली दि.१ ऑक्टोबर २०२० रोजी मदरसाच्या सर्व ट्रस्टींसह नोटीसा काढल्या आहेत.
न्युज अनकट प्रतिनिधी – अमोल यादव