“मिशन बिगीन अगेन” विषयी अधिसुचना जारी: जिल्हाधिकारी राम

पुणे, दि.१ जून २०२० : कोविड – १९ विषाणूच्या संसर्गाचा प्रादुर्भाव झपाटयाने वाढत असल्याने आपत्कालिन उपाय योजनेचा भाग म्हणून राज्यशासनाने संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रात लॉकडाऊनची घोषणा यापूर्वी केलेली आहे. ३० जून पर्यंत मुदतवाढ आणि टप्पे निहाय लॉकडाऊन समाप्त करणे आणि निर्बंध कमी करण्यासाठी  “मिशन बिगीन अगेन” बाबत अधिसूचना जाहीर केलेली आहे, असे  जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरणाचे अध्‍यक्ष तथा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले आहे.

आपत्ती  व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम २५ अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आलेली आहे. जिल्हाधिकारी हे या प्राधिकरणाचे पदसिध्द अध्यक्ष आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी  पुणे जिल्हयात आपत्ती व्यवस्थापन कायदा तसेच भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम१८९७ अन्वये पुणे महानगरपालिका क्षेत्र:- पुणे महानगरपालिका हद्दीत आयुक्त, पुणे महानगरपालिका यांचे आदेशातील अटी व शर्तीच्या अधीन राहून महानगरपालिका हद्दीतील सर्व उपक्रम व कृतींना परवानगी राहील. पिंपरी – चिंचवड महानगरपालिका पिंपरी -चिंचवड महानगरपालिका हद्दीत आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या आदेशातील  अटी व शर्तींच्या अधीन राहून महानगरपालिका हद्दीतील सर्व उपक्रम व व्यक्तींना परवानगी राहील. पुणे व खडकी छावणी परिषद :-पुणे व खडकी छावणी परिषद क्षेत्र पुणे महानगरपालिका हद्दीजवळ येत असल्याने आयुक्त महानगरपालिका पुणे यांच्या आदेशातील तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे व खडकी छावणी परिषद यांच्या आदेशातील अटी व शर्तींच्या अधीन राहून छावणी परिषद हद्दीतील सर्व उपक्रम व कृतींना परवानगी राहील.देहूरोड छावणी परिषद :-देहूरोड छावणी परिषद  क्षेत्र पिंपरी -चिंचवड महानगरपालिका हद्दीजवळ येत असल्याने आयुक्त महानगरपालिका पिंपरी-चिंचवड यांच्या आदेशातील व मुख्य कार्यकारी अधिकारी, देहूरोड छावणी परिषद यांचे आदेशातील अटी व शर्तींच्या अधीन राहून छावणी परिषद हद्दीतील सर्व उपक्रम व कृतींना परवानगी राहील. वरीलप्रमाणे क्षेत्र वगळता जिल्हयाचे उर्वरित सर्व क्षेत्र ग्रामपंचायत, नगरपालिका,नगरपरिषद, नगरपंचायत हद्दीत राज्य शासनाकडील अधिसूचनेत परवानगी देण्यात आलेल्या सर्व उपक्रम व कृतींना अधिसूचनेतील अटी व शर्तींच्या अधीन राहून परवानगी राहील.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष, तथा जिल्हादंडाधिकारी नवल किशोर राम, यांनी अधिसूचना सुधारणा पुणे जिल्हा कार्यक्षेत्रात लागू केली आहे. हे आदेश दिनांक ३० जून २०२० पर्यंत लागू राहतील आणि सर्व संबंधित प्रशासकीय विभाग यांनी या आदेशाची अंमलबजावणी करावी. या आदेशाचा भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, संस्था आणि संघटनाविरुध्द भारतीय साथ अधिनियम १८९७ आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व भारतीय दंडसंहिता (४५ ऑफ १८६०) कलम १८८ आणि या संदर्भातील शासनाचे प्रचलित इतर अधिनियम व नियम अन्वये योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राम यांनी सांगितले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा