पुणे, 28 मे 2022: काही काळापूर्वी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सर्व कंपन्यांना फ्लेक्स इंधन तंत्रज्ञानावर गांभीर्याने काम करण्यास सांगितलं होतं. आता Honda Motorcycles and Scooter India (HMSI) ने देखील यासाठी विस्तृत योजना आखल्या आहेत. हे स्पष्ट आहे की येत्या काही दिवसांत अशी होंडा अॅक्टिव्हा किंवा कोणतीही मोटारसायकल, जी पेट्रोल तसेच इथेनॉल किंवा इतर कोणत्याही इंधनावर रस्त्यावर धावणारी असणार आहे.
या देशात 10 वर्षांपासून आहेत अशी वाहने
HMSI सध्या भारतात पेट्रोलमध्ये किती इथेनॉल मिसळू शकते याचा अभ्यास करत आहे. जेणेकरून त्याच्या वाहनांची कार्यक्षमता अबाधित राहते आणि त्याच्या इंजिनवरही परिणाम होणार नाही. कंपनी गेल्या 10 वर्षांपासून ब्राझीलमध्ये फ्लेक्स-इंधन तंत्रज्ञान वापरत आहे आणि तिला तेथे बरेच यश मिळालं आहे. होंडाने आतापर्यंत 7 दशलक्षाहून अधिक फ्लेक्स-इंधन असलेल्या टू-व्हीलरची विक्री केलीय.
2024 पर्यंत अपेक्षित
कंपनी 2024 पर्यंत भारतात फ्लेक्स-इंधन इंजिनसह 2-व्हीलर लॉन्च करू शकते. यावर सध्या काम सुरू आहे. त्याआधी, कंपनी इलेक्ट्रिक टू-व्हीलर आणि बॅटरी स्वॅपिंग नेटवर्क सेट करण्यावर भर देत आहे.
फ्लेक्स-इंधन वापरून गाडी चालवणं स्वस्त
फ्लेक्स फ्युएल इंजिन ही वाहनांमध्ये स्थापित केलेली इंजिने आहेत जी एकापेक्षा जास्त इंधन पर्याय वापरू शकतात. अशी इंजिने इंधन म्हणून पेट्रोल तसेच इथेनॉल, सीएनजी, बायो-एलएनजी आणि इलेक्ट्रिक पॉवर वापरू शकतात. एक प्रकारे, तुम्ही त्यांना हायब्रिड इंजिन म्हणून विचार करू शकता.
जर वाहनं फ्लेक्स इंधन इंजिनसह आली, तर लोक त्यांची वाहनं इथेनॉलवरही चालवू शकतील. इथेनॉलची किंमत 65 रुपये प्रति लीटर आहे, तर पेट्रोलची किंमत सध्या 100 रुपये प्रति लिटर आहे. इथेनॉलची ज्वलन कार्यक्षमता पेट्रोलच्या तुलनेत कमी असते. एक लिटर इथेनॉल हे 800 ग्रॅम पेट्रोलच्या बरोबरीचे असते. अशाप्रकारे वाहनांमध्ये फ्लेक्स फ्युएल इंजिन आल्यास लोकांच्या प्रति लिटर पेट्रोलचा दर 20 रुपयांनी कमी होईल.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे