गर्भधारणा टाळण्यासाठी आता “फिमेल कंडोम”

पुणे : आपल्या देशात अनेक महिला प्रेग्नंसीपासून वाचण्यासाठी गर्भनिरोधक गोळ्यांचे मोठ्या प्रमाणावर सेवन करत असतात. अशा गोळ्या घेणं त्यांच्या आरोग्यासाठी हानिकारकही ठरू शकतं. परंतु जर महिलांना प्रेग्नंट व्हायचं नसेल तर आणि हानिकारक गोळ्याही घ्यायच्या नसतील तर त्यांच्यासाठी आता मार्केटमध्ये नवीन उपाय ठेवण्यात आला आहे. जसे पुरुष कंडोमचा वापर करतात त्याप्रमाणेच आता महिलांसाठी देखील महिला कंडोम बाजारात उपलब्ध झाले आहेत. त्याचा वापर महिला करू शकतात.
हा एक फीमेल कंडोम आहे जो महिलांसाठी तयार करण्यात आला आहे. महिला कंडोम आता भारतातही उपलब्ध आहे. शारीरिक संबंध ठेवताना याचा वापर केल्यास पूर्णपणे सुरक्षा मिळते. “वेलविट” नावाच्या ब्रँडचा हा फीमेल कंडोम मार्केटमध्ये उपलब्ध आहे.

याबाबत एका कंपनीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, ‘गर्भनिरोधक गोळ्यांनंतर आता नको असलेली प्रेग्नंसी टाळण्यासाठी हा दुसरा उपाय आहे.’ त्यामुळे महिलांना प्रेग्नेंशी रोखण्यासाठी हानिकारक गर्भनिरोधक गोळ्या घेण्याची आवश्यकता नाही. या फिमेल कंडोमचे फायदे आपण काय आहेत पाहू या.

◆ गर्भनिरोधक गोळ्यांसाठी दुसरा चांगला पर्याय.
◆ कोणतेही साईड इफेक्ट्स नाहीत.
◆ अनेक आजारांपासून बचाव.
◆शरीरासाठी हानिकारक नाही.
◆ नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी फायदेशीर.

महत्वाचे…
हा बाजारात उपलब्ध असणारा फिमेल कंडोम बाजारात फार कमी प्रमाणात उपलब्ध आहे. कारण या कंडोमची किंमत जास्त असते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे , जर हा कंडोम योग्य पद्धतीनं लावला गेला नाही तर तो फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे तो वापरताना योग्य ती काळजी घेणे गरजेचे असते.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा