आता कार घेणं होणार सोपं, ही बँक देणार 30 मिनिटांत कर्ज

10

पुणे, 29 एप्रिल 2022: खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या HDFC बँकेने ग्राहकांना कार कर्ज देण्यासाठी एक नवीन सेवा सुरू केलीय. या सेवेअंतर्गत ग्राहकांना यापुढे कार लोन घेण्याचा त्रास सहन करावा लागणार नाही. ही सेवा पूर्णपणे ऑनलाइन असून यामध्ये ग्राहकांना त्यांच्या आवडीनुसार फायनान्सची सुविधा अवघ्या 30 मिनिटांत मिळणार आहे.

कार लोन मिळण्यासाठी किती वेळ लागेल?

एचडीएफसी बँकेने अशा वेळी ही सेवा सुरू केली आहे, जेव्हा देशात व्यापार तेजीत आहे. बँकेने या सेवेला एक्सप्रेस कार लोन्स असं नाव दिलंय. बँकेचा दावा आहे की ही भारताची नाही तर कदाचित संपूर्ण जगात अशी पहिलीच सेवा आहे. या सेवेअंतर्गत, HDFC बँक ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे ग्राहकांना 30 मिनिटांच्या आत कर्ज देईल. सध्या, कार लोन मिळविण्यासाठी साधारणपणे 48 ते 72 तास लागतात.

दुचाकी कर्जासाठीही तयारी सुरू

उद्योगाच्या आकडेवारीनुसार, कर्ज पोर्टफोलिओमध्ये ‘होम लोन’ नंतर, ‘कार लोन’ हे सर्वाधिक ग्राहक आहेत. बँकेला अशी अपेक्षा आहे की नवीन झटपट सेवा सुरू केल्याने, ती 2022-23 या आर्थिक वर्षात 10 हजार ते 15 हजार कोटी रुपयांपर्यंतच्या कार कर्जांचं वितरण करू शकेल. बँकेच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, यानंतर दुचाकींसाठीही वित्तपुरवठा करण्यासाठी संपूर्ण डिजिटल प्लॅटफॉर्म आणण्याची योजना आहे.

बँकेला या सेवेकडून खूप आशा

अरविंद कपिल, कंट्री हेड, रिटेल अॅसेट्स, HDFC बँक, स्पष्ट करतात की ‘एक्स्प्रेस कार लोन्स’ सेवेमुळं कारसाठी कर्ज घेणे सोपे होईल. हे विशेषतः निमशहरी आणि ग्रामीण बाजारपेठेत गेम चेंजर ठरेल. ते म्हणाले, ‘भारतातील 90 टक्के लोक ऑनलाइन कार खरेदी करण्याची तयारी सुरू करतात, मात्र यापैकी केवळ 2 टक्के लोक संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन करतात. आमच्या विद्यमान ग्राहकांपैकी किमान 20-30 टक्के ग्राहक आणि संभाव्य ग्राहकांनी एक्सप्रेस कार लोनद्वारे या सेवेचा लाभ घ्यावा अशी आमची इच्छा आहे.’

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा