आता मुकेश अंबानींनींचा ‘ग्रीन एनर्जी’ वर फोकस, या चीनी कंपनीला 5792.64 कोटींमध्ये केले खरेदी

9
नवी दिल्ली, 11 ऑक्टोंबर 2021: उद्योगपती मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ने चाइना नेशनल ब्लूस्टार (ग्रुप) ची कंपनी REC सोलर होल्डिंग्स एएस (REC ग्रुप) ला खरेदी करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता रिलायन्स इंडस्ट्रीज ग्रीन एनर्जी वर फोकस करताना दिसत आहे.
रिलायन्स न्यू एनर्जी सोलर लिमिटेड (RNESL), RIL ची संपूर्ण मालकीची उपकंपनी, REC ग्रुपमधील 100 टक्के भाग चीन नॅशनल ब्लूस्टार (ग्रुप) कडून खरेदी करण्याची घोषणा केली आहे.  हा करार 77.1 कोटी अमेरिकन डॉलर म्हणजेच सुमारे 5792.64 कोटी रुपयांच्या एंटरप्राइझ मूल्यावर सेटल झाला आहे.
नॉर्वेमध्ये मुख्यालय असलेल्या आरईसी सोलर होल्डिंग्समध्ये 446 यूटिलिटी आणि डिझाइन पेटंट आहेत.  सिंगापूरमध्ये कंपनीचा ऑपरेशनल बेस आहे आणि अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया आणि आशिया पॅसिफिकमधील प्रादेशिक केंद्र आहेत.  जून महिन्यात RIL चे चेअरमन मुकेश अंबानी यांनी पुढील तीन वर्षात 75,000 कोटी रुपये क्लीन एनर्जीत गुंतवण्याची माहिती दिली होती.
आरआयएलची भावी योजना
रिलायन्स कंपनी जामनगरमध्ये बांधल्या जाणाऱ्या धीरूभाई अंबानी ग्रीन एनर्जी गीगा कॉम्प्लेक्समध्ये आरईसीच्या सर्वोत्तम तंत्रज्ञानाचा वापर करेल, ज्याची क्षमता वार्षिक 4 GW पासून 10 GW पर्यंत वाढवण्याची योजना आहे.  येथे आरईसीकडे सर्वोत्तम सौर तंत्रज्ञान आहे.
 या अधिग्रहणाबद्दल आरआयएलचे अध्यक्ष मुकेश अंबानी म्हणाले, “आरईसीच्या अधिग्रहणामुळे मी अत्यंत खूश आहे, कारण यामुळे सौर ऊर्जेच्या अमर्यादित आणि वर्षभर सौर ऊर्जा वापरण्यास मदत होईल.”  हे अधिग्रहण नवीन आणि प्रगत तंत्रज्ञान आणि ऑपरेशनल क्षमतांमध्ये गुंतवणूक करण्याच्या आमच्या धोरणाशी सुसंगत आहे जेणेकरून रिलायन्सचे दशक संपण्यापूर्वी 100 GW स्वच्छ आणि हरित ऊर्जा निर्माण करण्याचे उद्दिष्ट साध्य होईल.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा