आता न्यूयॉर्क मधेही मिळणार दिवाळीची सुट्टी

न्यूयॉर्क, दिनांक २१ ऑक्टोबर २०२२: भारतातील सर्वात मोठा सण दिवाळी परदेशातही साजरा होत असतो. अमेरिकेतील सर्वात मोठ्या शहरांपैकी एक असलेल्या न्यूयॉर्क शहराने तर दिवाळीची सुट्टी जाहीर केली आहे.

महापौर एरिक अॅडम्सक्ष यांनी गुरुवारी सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत सार्वजनिक शाळेच्या वेळापत्रकात दिवाळी सुट्टीचा समावेश करण्याची योजना जाहीर केली. एरिक म्हणाले की, “हे बर्याच काळापासून योजनेत होते. यातून मुलांना दीपोत्सवाची माहिती मिळेल आणि यातून शहराच्या संस्कृती चा संदेश लोकांपर्यंत पोहोचेल. ही शिकण्याची संधी आहे. कारण जेव्हा आपण दिवाळी साजरी करतो तेव्हा आपण मुलांना त्याबद्दल शिकवतो. आम्ही मुलांना दिवाळी म्हणजे काय हे शिकण्यासाठी प्रोत्साहित करणार आहोत. दिव्यांचा सण साजरा करणे म्हणजे काय हे शिकवू.”

दोन दशकाहून अधिक काळ, न्यूयॉर्कमधील दक्षिण आशियाई आणि इंडो-कॅरिबियन लोक दिवाळीला शाळेला सुट्टी मिळावी यासाठी संघर्ष करत होते. पुढील वर्षी म्हणजे २०२३ पासून न्यूयॉर्क शहरातील सर्व सार्वजनिक शाळांमध्ये दिवाळीची सुट्टी असेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी : केतकी कालेकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा