आता PM मोदी 12 कोटींची मर्सिडीज वापरणार, बुलेट आणि बॉम्बस्फोटाचाही होणार नाही परिणाम

नवी दिल्ली, 29 डिसेंबर 2021: पंतप्रधान नरेंद्र मोदी आता मर्सिडीज-मेबॅच एस 650 बुलेटप्रुफ वाहनांनी सजवलेल्या ताफ्यात फिरताना दिसणार आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना भेटण्यासाठी पंतप्रधान मोदी नुकतेच हैदराबाद हाऊसमध्ये नवीन मेबॅक 650 मध्ये पहिल्यांदाच दिसले. हे वाहन नुकतेच पुन्हा पंतप्रधानांच्या ताफ्यात दिसले.

Mercedes-Maybach S650 Guard हे VR10 स्तरावरील संरक्षणासह लेटेस्ट फेसलिफ्ट केलेले मॉडेल आहे जे आत्तापर्यंत उत्पादित केलेल्या वाहनांपैकी सर्वात अधिक प्रोटेक्शन प्रदान करते. अहवालानुसार, Mercedes-Maybach ने गेल्या वर्षी भारतात S600 Guard मॉडेल लाँच केले होते ज्याची किंमत ₹10.5 कोटी होती तर याचे दुसरे मॉडेल S650 ची किंमत ₹12 कोटींपेक्षा जास्त असू शकते.

भारताच्या पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी जबाबदार असलेले स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (SPG) सुरक्षेच्या गरजा लक्षात घेतात यामध्ये ते ज्या व्यक्तीला सुरक्षा प्रदान करत आहेत त्या व्यक्तीला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आवश्यक वाहना विषयी देखील गरजा पूर्ण करत असतात.

Mercedes-Maybach S650 Guard मध्ये 6.0-लिटर ट्विन-टर्बो V12 इंजिन आहे जे 516bhp आणि सुमारे 900Nm पीक टॉर्क निर्माण करते. गाडीचा कमाल वेग 160 किमी प्रतितास इतका मर्यादित आहे.

S650 गार्ड बॉडी आणि गाडीच्या खिडक्या हार्ड स्टील कोर बुलेटचा सामना देखील करू शकतात. यासह या कार ला एक्स्प्लोजन प्रूफ व्हेईकल (ERV) रेटिंग देखील मिळाले आहे. या कार मध्ये असलेले प्रवासी 2 मीटर अंतरावर होणाऱ्या 15 किलो TNT स्फोटापासून देखील सुरक्षित राहू शकतात. खिडकीच्या आतील भागावर पॉली कार्बोनेटची लेयर आहे. कारचा खालचा भाग कोणत्याही प्रकारच्या स्फोटांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी आर्मर्ड आहे. गॅस अटॅक झाल्यास केबिनमध्ये स्वतंत्र हवा पुरवठा देखील आहे.

मर्सिडीज-मेबॅक S650 गार्डचा फ्युल टँकला एका विशेष सामग्रीने कोट केले गेले आहे जी आपोआप हिटमुळे होणारी छिद्रे सील करते. ही सामग्री बोईंग त्याच्या AH-64 अपाचे टँक अटॅक हेलिकॉप्टरसाठी वापरते या कारमध्ये देखील त्याच सामग्रीपासून ते तयार केले आहे. कार स्पेशल रन-फ्लॅट टायर्सवर चालते जे खराब झाल्यास टायर सपाट करतात.

कारमध्ये सीट मसाजरसह आलिशान इंटीरियर आहे. कारमध्ये लेगरुम वाढवण्याची सुविधा आहे. यासाठी मागील सीट बदलण्यात आल्या आहेत.

यापूर्वी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून पंतप्रधान मोदींनी बुलेटप्रूफ महिंद्रा स्कॉर्पिओमध्ये प्रवास केला होता. त्यानंतर 2014 मध्ये पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी BMW 7 मालिका हाय-सिक्युरिटी एडिशन वापरली.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा