आता भाजपला चित्ता सरकार बोलायचे का? उद्धव ठाकरे

मुंबई, १८ सप्टेंबर २०२२ : भारत देशात ७० वर्षांनी पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशात चित्ता आणण्यात आले यावरून आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी आणि भाजप सरकारला खोचक टोला लगावला आहे.

आज भारत देशात ७० वर्षानंतर चित्ता हा प्राणी आणला आहे मराठीमध्ये आपण त्याला चित्ता आणि इंग्लिश मध्ये आपण चिता बोलतो, आम्ही पेंग्विन आणले म्हणून आम्हाला पेंग्विन सरकार बोलले जात होते. मग आम्ही भाजप सरकारला चित्ता सरकार बोलायचे का अशी टीका ही उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली आहे.

दरम्यान त्यांनी प्रताप सरनाईक यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. प्रताप सर नाईक यांच्यावर महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना किरीट सोमय्या यांनी आरोप केला होता यासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी केस मागे घेण्याची घाई का असावाही केला आहे. प्रताप सरनाईक शिंदे सरकार मध्ये गेल्याने त्यांची केस मागे घेण्याची घाई करत असल्याची टीका ही उद्धव ठाकरे यांनी केली आहे..

न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा