आता एटीएम देणार कापडी बॅग

चिकोडी: १२ एप्रिल २०२३: पर्यावरण प्रदुषण रोखण्यासाठी प्लास्टिक मुक्त समाज निर्माण करण्याचे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. याचाच भाग म्हणून आता राज्यात प्रायोगिक तत्त्वावर पहिले एटीएम क्लोथ वेडिंग मशीन चिकोडी शहरात बसविले जात आहे. संपूर्ण जग आज पर्यावरण प्रदुषणामुळे त्रस्त असून जागतिक तापमान वाढ व पर्यावरनाचा समतोल ढासळत आहे. पर्यावरण प्रदुषणाचे मुळ कारण म्हणजे प्लास्टिक आहे.

प्लास्टिक कुजत नसल्यामुळे ते जाळल्यास विषारी वायू बाहेर पडतात. तसेच प्लास्टिक पिशव्या व साहित्य टाकल्याने गटारी, नधा, नाले तुंबून पाणी प्रदुषणासह जलचर मृत्यूमुखी पडतात. आज जगासमोर प्लास्टिक कचऱ्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. कर्नाटक राज्य परिसर प्रदुषण नियंत्रण मंडळ, नगरपरिषद चिकोडी व तालुका कायदा सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हे मशीन बसविण्याचे उपक्रम राबविला जात आहे.

संपूर्ण राज्यात पहिल्यांदाच चिकोडीत एटीएम क्लोथ वेडिंग मशीन बसविले जाणार आहे. याद्वारे कापडी पिशवी देऊन प्लास्टिक मुक्त समाज निर्मितीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. प्लास्टिक विक्री प्रकरणी वर्षभरात चार लाख रुपये दंड व्यापाऱ्यांकडून वसूल करण्यात आला आहे. पुढील काळात १०० टक्के प्लास्टिक बंदी केली जाणार आहे. असं सांगण्यात आलं आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा