आता सिरम इन्स्टिट्यूट देखील तयार करणार रशियाची लस स्पुतनिक-व्ही

पुणे, ५ जून २०२१: कोरोना साथीच्या आजारापासून बचाव करण्यासाठी लस उत्पादन जोरात सुरू आहे. दरम्यान, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (एसआयआय) ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय) कडे भारतात रशियन लस स्पुतनिक -व्ही तयार करण्यासाठी चाचणी परवान्यासाठी परवानगी मागितली. डीसीजीआयने काल (शुक्रवार) स्पुतनिक-व्ही च्या उत्पादनासाठी सीरमला मान्यता दिली आहे.

डीसीजीआयची मान्यता मिळाल्यानंतर सीरम भारतात स्पुतनिक-व्ही तयार करू शकेल. डीसीजीआयने परीक्षा, चाचणी आणि विश्लेषणासह स्पुतनिक -व्ही तयार करण्याची परवानगी दिली आहे. सीरम आधीच कोविड लस कोविशिल्डची निर्मिती करीत आहे. परंतु आता ही कंपनी स्पुतनिक नावाची रशियन लस देखील तयार करेल. सीरम इन्स्टिट्यूटने चाचणी, विश्लेषण आणि परीक्षेसाठी डीसीजीआयकडे अर्ज केला होता.

सध्या डॉ. रेड्डीज लॅब मध्ये स्पुतनिक-व्हीची निर्मितीही केली जात आहे. या रशियन लसीचा वापर १४ मेपासून सुरू झाला. स्पुतनिक आता ५० हून अधिक देशांमध्ये नोंदणीकृत आहे. एका अभ्यासानुसार या लसीची (दोन्ही डोसची) कार्यक्षमता ९७.६ टक्के आहे.

दुसरीकडे सीरम इन्स्टिट्यूटने अशी मागणी केली आहे की परदेशी लसी कंपन्यांप्रमाणेच त्यांनाही सरकारने संरक्षण दिले पाहिजे. वृत्तसंस्था एएनआय च्या म्हणण्यानुसार, सीरम इन्स्टिट्यूटसह इतर देशी लसी कंपन्यांनी आता अपील केले आहे की जर परदेशी कंपन्यांना ही सुविधा मिळत असेल तर त्यांनाही सरकारने संरक्षण दिले पाहिजे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा