एनआरसीमुळे देशाचा फायदा होईल – बाबा रामदेव

42

नवी दिल्ली- योग गुरू बाबा रामदेव यांनी गृह मंत्री अमित शाह यांच्या नेशनल रजिस्टर ऑफ सिटिजंस(एनआरसी)वर संसदेत दिलेल्या स्पष्टीकरणाचे कौतुक केले. ते म्हणाले की, “एनआरसी राष्ट्रीय सुरक्षा ठेवण्यासाठी गरजेचे आहे. याचे राजकारण होता काम नये. जर एखाद व्यक्ती देशात अवैधरित्या घुसला असेल, तर तो देशासाठी धोकादायक ठरू शकतो.”

पुढे ते म्हणाले की, “आपल्या देशाची सुरक्षा करणे हे आपले कर्तव्य आहे. एनआरसी यासाठी फायद्याची ठरू शकते. हा सामाजिक आणि राजकीय मुद्दा नाहीये, त्यामुळे यावर राजकारण होता काम नये.”