एनआरसी संपूर्ण देशात लागू होणार : अमित शहा

नवी दिल्ली: नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन (एनआरसी) आता संपूर्ण देशात लागू होणार असल्याची घोषणा भाजपाध्यक्ष आणि केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी केली आहे.राज्यसभेत बोलताना त्यांनी आज ही घोषणा केली आहे.

एनआरसीमध्ये धर्माच्या आधारावर भेदभाव केला जाणार नाही. जे भारताचे नागरिक असतील त्यांना एनआरसीमध्ये सामावून घेतले जाईल, असं अमित शहा यांनी स्पष्ट केले आहे. एनआरसीमध्ये आणि सिटीझन अमेंडमेंट बील यामध्ये फरक असल्याचेही अमित शहा यांनी यावेळी सांगितले.

आज लोकसभेत अमित शहा यांनी या संदर्भातील सर्व प्रश्नांची उत्तरे दिली.
अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि पाकिस्तानमधून धर्माच्या आधारावर निर्वासित करण्यात आलेल्या हिंदू, जैन, बौद्ध, ख्रिश्चन, शीख आणि पारशी धर्मियांना नागरिकत्व देण्यासाठी नागरिकत्व देण्यासाठी नागरिक संशोधन बील गरजेचे असल्याचे मत अमित शहा यांनी व्यक्त केले.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा