NSA अजित डोवाल यांच्या सुरक्षेत त्रुटी, ३ कमांडो बडतर्फ

नवी दिल्ली, १८ ऑगस्ट २०२२: देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांच्या सुरक्षेतील त्रुटींशी संबंधित एका प्रकरणात कारवाई करत सरकारने ३ कमांडोना त्यांच्या नोकरीतून बडतर्फ केले आहे. हे कमांडो डोभाल यांच्या सुरक्षेत गुंतले होते जेव्हा एक वाहन त्यांच्या घराच्या गेटवर पोहोचलं होतं. याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली होती.

फिदाईन प्रकारचा हल्ला

NSA अजित डोवाल यांच्या घरातील सुरक्षा त्रुटीप्रकरणी CISF च्या तपास अहवालात अनेक खुलासे झाले आहेत. हा तपास अहवाल सुमारे १०० पानांचा आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाशी संबंधित सूत्रांचं म्हणणं आहे की सीआयएसएफला हा फिदाईन प्रकारचा हल्ला असल्याचं गृहीत धरावं लागलं. सीआयएसएफच्या जवानांनी गोळीबार करायला हवा होता पण तसं झालं नाही. त्यामुळं सुरक्षेत तैनात असलेल्या जवानांवर कारवाई करण्यात यावी.

मंत्रालयातील सूत्रांनी सांगितलं की, १६ फेब्रुवारी २०२२ रोजी एनएसए अजित डोवाल यांच्या घराच्या गेटवर पोहोचलेल्या वाहनात उपस्थित असलेल्या व्यक्तीने आधी रेकी केली असावी. त्यामुळे सायंकाळी ७.३२ वाजण्याच्या सुमारास त्यांनी चुकीच्या बाजूने कार आणून एनएसएच्या घराच्या गेटवर धडक दिली. यावेळी गेटवर ३ कमांडो उपस्थित होते, मात्र त्यांच्या बाजूने एकही पाऊल उचलले गेले नाही.

डोवाल यांना Z+ सुरक्षा

त्यावेळी Z+ श्रेणी सुरक्षा असलेले अजित डोवाल त्यांच्या घरी होते. या मोठ्या सुरक्षेतील त्रुटीमुळं सीआयएसएफचे ३ कमांडो बडतर्फ करण्यात आले आहेत. यामध्ये २ उपनिरीक्षकांना निलंबित करण्यात आलं आहे. तसेच १ डीआयजी आणि १ कमांडंटच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तपासातील ही उणीव ही ‘रेरेस्ट ऑफ रेअर’ प्रकरण मानली जात असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.

अजित डोवाल यांना Z+ श्रेणीची सुरक्षा आहे, त्यांच्याभोवती कडेकोट सुरक्षारक्षक आहे. यात ५८ कमांड्स आहेत. यात १० सशस्त्र स्थिर रक्षक, ६ PSO, २४ जवान, ५ वॉचर्स (दोन शिफ्टमध्ये) आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा