मुंबई : राज्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.त्यातच शासनाकडून करण्यात येणारे पंचनाम्यामध्ये अनेक अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे प्रशासनाने जुनाट पध्द्तीने पंचनामे न करता ड्रोनद्वारे पंचनामे करावेत, अशी मागणी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य संयोजक राम नेवले यांनी केली आहे.
ड्रोनने केलेल्या पंचनाम्यातून सभोवतालच्या परिस्थितीची दाहकता समजणे सोपे होईल. आणि पंचनामे अचूक पध्द्तीने करता येतील. त्यामुळे ड्रोनद्वारे अतिवृष्टी झालेल्या भागाचे पंचनामे व्हावे, अशी मागणी नेवले यांनी यावेळी केली आहे.