मुंबई : देशभरात कोरोनाचे १० नवे रुग्ण आढळून आले आहेत. सुरुवातीला दिल्ली, उत्तर प्रदेश आणि केरळपर्यंत मर्यादित असलेला कोरोनाचा व्हायरस आता महाराष्ट्र आणि केरळातही दाखल झाला आहे.
महाराष्ट्रात मंगळवारी कोरोनाचे दोन रुग्ण आढळल्यानंतर केरळमध्ये ६ आणि कर्नाटकात ४ रुग्ण आढळले आहेत. कोरोनाचे नवीन रुग्ण आढळून आल्याची माहिती केरळच्या मुख्यमंत्र्यांनी दिली.
कर्नाटकच्या आरोग्यमंत्र्यांनी करोनाचे 4 रुग्ण आढळल्याचे सांगितले.
यानुसार देशातील कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५७ झाली आहे. नवीन रुग्णांसंदर्भात केंद्राकडून अद्याप कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही.
केरळमध्ये कोरोनाचे आणखी ६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे राज्यातील सातवीपर्यंतच्या शाळा बंद ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यांच्या परीक्षा २३ मार्चपर्यंत स्थगित केल्या गेल्या आहेत.
८, ९ आणि १० वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार होतील. याशिवाय ट्युशन क्लासेस, आंगणवाडी, मदरसा ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी सांगितलं आहे.