ओडिशा सरकारकडून फटाके उडवण्यावर बंदी

ओडिशा, ४ नोव्हेंबर २०२० : आगामी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ओडिशा सरकारने १० ते ३० नोव्हेंबर पर्यंत फटाके विक्री आणि फटाके उडवण्यावर बंदी घातली आहे. कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर आणि थंडीच्या काळात फटाके उडवण्याचे संभाव्य हानिकारक परिणाम लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

फटाक्यांमधून बाहेर पडणाऱ्या नायट्रस ऑक्साईड, सल्फर डाय ऑक्साईड आणि कार्बन मोनोऑक्साइड सारख्या विषारी वायूंचा, श्वसनावर आणि आपल्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात वाईट परिणाम होतो. विशेषतः लहान मुलं, वृद्ध आणि आजारी व्यक्ती यांना मोठा धोका संभवतो. यामुळे हवेतील तरंगणाऱ्या कणांचे प्रमाण वाढून त्याचाही श्वसनाला त्रास होतो.

यामुळे एकूणच हवेची गुणवत्ता खराब होते. सरकारने यंदा पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करायचंआवाहन केलं आहे. दरम्यान ओडिशा राज्यात कोविड-१९ च्या उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या १४ हजारच्या खाली गेली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा