ऑफिसमध्ये ओवरटाईम करताय…. सावधान!

पुणे : ऑफिसमध्ये खूप वेळ जागून काम करून तुम्हाला बॉसच्या नजरेत चांगले राहायचं असतं. त्यासाठी काहीवेळा तुम्ही प्रयत्न करत असता. तुमच्या अशा वागण्यामुळे ऑफिसमध्ये नक्कीच फायदा होईल. तसंच तुम्हाला प्रमोशन सुध्दा मिळू शकतं. पण या सवयींचा आरोग्यावर नकारात्मक परिणाम होत असतो. असे एका अहवालातून समोर आले आहे.

एका आठवड्यात जर तुम्ही ४९ तासांपेक्षा जास्त वेळ ऑफिसमध्ये काम करण्यासाठी थांबत असाल तर उच्च रक्तदाबाचा धोका उद्भवू शकतो.

दररोज दहा तास ऑफिसमध्ये बसून काम करणाऱ्या लोकांमध्ये रक्तदाब वाढण्याचा धोका ६६ टक्क्यांनी अधिक असतो.

◆ या संबंधी एक रिसर्च करण्यात आला होता. त्यात असं दिसून आलं की ओवरटाईम करणाऱ्या लोकांना आजार होण्याचा धोका अधिक प्रमाणात असतो.

◆ या रिसर्चसाठी कॅनडामधील ३ पब्लिक इंस्टिट्यूशन्समध्ये ३ हजार ऑफिस वर्क करत असलेल्या कर्मचारी वर्गाचे निरिक्षण करण्यात आले होते. जवळपास ५ वर्ष या लोकांवर नजर ठेवण्यात आली होती.

◆ या रिसर्चमध्ये त्या व्यक्तींचं शिक्षण, ऑक्यूपेशन, स्मोकिंग स्टेटस, बीएमआय, कामाच्या तणावाची पातळी या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या होत्या.

◆ त्यानुसार मास्क्ड हायपरटेंशन सारख्या समस्या त्या व्यक्तींना हृद्याच्या आजाराजवळ घेऊन जात असल्याचे दिसून आले.

◆ कॉर्पोरेट ऑफिसमध्ये कर्मचारी वर्गाला तासनतास एकाच जागी बसून काम कराव लागतं. त्यामुळे वेगवेगळे आजार होण्याचा धोका अधिक असतो.

◆ जे एकाच जागी बसून काम करतात. त्यांनी १० मिनिटं वेळ काढून वर्कआऊट करायला हवं. त्यामुळे आजार पणापासून दूर राहता येत.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा