डहाणू येथील मेंढवन खिंडीत ऑईल टँकर पलटला, गुजरातकडील वाहतूक धिम्या गतीने

पालघर, ३ ऑगस्ट २०२३ : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणू तालुक्यातील मेंढवन खिंडीत चिंचपाडा येथे ऑईल नेणारा टँकर पलटला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तर गुजरातकडे जाणारी वाहतूक धिम्या गतीने सुरू आहे. यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शिवडी येथून गुजरातकडे ऑईल टँकर जात असताना चालकांचे नियंत्रण सुटल्याने तो पलटला. या घटनेत टँकर चालक किरकोळ जखमी झाले असून कोणतीही जीवितहानी झाली नाही. मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरळीत सुरू आहे.

दरम्यान ऑईल टँकरमधून गळती सुरू असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून गुजरातकडे जाणारा एक मार्ग बंद करण्यात आली आहे. तर तीन मार्गावरील वाहतूक धिम्या गतीने सुरू आहे. महामार्ग पोलीस, मृत्यूंजय दूत, महामार्ग यंत्रांना घटनास्थळी तात्काळ दाखल झाले आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा