कन्नड, छत्रपती संभाजीनगर, २० जानेवारी २०२४ : कन्नड तालुक्यातील नादरपुर फाटयावरील सोमीनाथ सांडु निकम यांच्या घरामध्ये चोरी करणारा चोर अखेर सापडला आहे. आकाश छगन काळे (रा. अंतापुर ता. गंगापुर) असे चोराचे नाव असून त्याचे दोन साथीदार फरार झाले आहे. सदर चोराला चोरी करतानाच नागरिकांनी पकडले आणि बेदम मार देत पोलिसांच्या स्वाधीन केले.
सोमनाथ सांडू निक्कम याच्या घरामध्ये ज्या ठिकाणी चोरी झाली त्या ठिकाणी पाहणी केली असता निकम याच्या पाठीमागील दरवाज्याचा आतील कडी कोंडा तोडलेला होता. घरातील लोखंडी कपाटातील लॉकरमध्ये असलेले २०,०००/- रुपये रोख व ३५,०००/- रुपये किंमतीचे ०७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे ०२ झुब्बे चोरीला गेले असल्याची माहिती पीडिताने दिली. आकाश छगन काळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याने सांगितलेल्या माहितीनुसार बॉबी संतोष काळे गुंड्या डीचार्ज काळे या चोरांचा तपास सुरु आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : मिलिंद कुमार लांडगे










































