ऑलिम्पिकसाठी १४ खेळांना केंद्राकडून प्राधान्य

नवी दिल्ली: जगातील सर्वात मोठ्या क्रीडास्पर्धांचा महोत्सव म्हणजेच ऑलम्पिक स्पर्धा होय. पुढील वर्षी अर्थात २०२० मध्ये जपानमधील टोकियो शहरात या स्पर्धा पार पडणार आहे.
या स्पर्धेत अधिकाधिक पदके जिंकता यावीत म्हणून भारताने २०२४ आणि २०२८ यावर्षी होणाऱ्या ऑलम्पिक स्पर्धांच्या अनुषंगाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
यासाठी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून योजना आखण्यात आली असून त्यानुसार १४ खेळांना प्राधान्य देण्यात आले आहे.

◆ साल २०२४ :तिरंदाजी, बॉक्सिंग, नेमबाजी, बॅडमिंटन, कुस्ती, हॉकी, वेटलिफ्टिंग, सायकलिंग, ऍथलेटिक्स.

◆साल २०२८ : वरील नऊ खेळांसह टेबल टेनिस, ज्युडो, जलतरण, तलवारबाजी व रोइंग.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा