ओमानचे सुलतान काबूस बिन सैद अल सैद यांचे निधन

ओमान : ओमानचे सुलतान काबूस बिन सैद अल सैद यांचे वयाच्या ७९ व्या वर्षी निधन झाले. आखाती देशांमध्ये सर्वाधिक काळ त्यांनी सत्ता उपभोगली. ते मोठ्या आतड्याच्या कर्करोगाशी झुंज देत होते. बेल्जीयम येथे त्यांच्यावर उपचार सुरु होते.
ओमानमध्ये त्यांच्या निधनाबद्दल ३ दिवसांचा राष्ट्रीय दुःखवटा जाहीर केला आहे. सुलतान काबूस यांनी १९७० साली त्यांचे वडील, सैद बिन तैमूर यांना सत्तेवरून पायउतार करत सत्ताग्रहण केले होते. तेव्हापासून मागील ५ दशकं त्यांनी ओमानवर आपली सत्ता कायम ठेवली होती.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुलतान यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
भारत व ओमान यांच्यातले संबंध वृद्धिंगत करण्यासाठी त्यांनी महत्वाचे दिले, असेही मोदी म्हणाले. ओमानचे सुलतान काबूस बिन सैद अल सैद यांच्या निधनानंतर त्यांचे उत्तराधिकारी म्हणून ओमानचे सांस्कृतिक मंत्री हैथाम बिन तारिक अल सैद यांनी राजेपदाची सूत्रे स्वीकारली आहेत.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा