ओंकारनाथ शर्मा उर्फ ‘ मेडिसिन बाबा ‘ गरिबांची करतात विनामुल्य सेवा

नोएडा, १७ जून २०२० : सध्याच्या काळात अनेक बाबांची प्रकरण बाहेर येत असतानाच आता एक असे पण बाबा समोर आले आहेत जे समाजाचे आपण काही देणे लागतो हे गृहित धरून गोरगरिबांना मदत करीत आहेत ते म्हणजे नोएडा येथील ओंकारनाथ शर्मा उर्फ ‘ मेडिसीन बाबा.’

ओंकारनाथ ग्रेटर नोएडा (उ. प्र.) मधील कैलाश हॉस्पीटलमधील सेवानिवृत्त रक्तपेढी तंत्रज्ञ आहेत. ते लोकांकडून स्वेच्छेने न वापरलेली औषधे गोळा करतात आणि गरिबांना विनामुल्य वितरीत करतात. त्यांच्या या कार्याबद्दल बोलताना ते सांगतात की , पुर्व दिल्लीत मेट्रोचा निर्माणाधीन पुल कोसळल्याचे पाहून त्यात दोन मजूरांचा मृत्यू व अनेक जण गंभीर झाल्यानंतर त्या मजूरांना तेथील स्थानिक रूग्णालयात प्राथमिक प्रथमोपचार झाले नाही आणि ते मजूर तो उपचाराचा खर्च परवडत नसल्याने उपचारा अभावी मृत्यूमुखी पडले , या घटनेमुळे मला हदरवून सोडले व पुन्हा असे प्रकार घडू नये याचा मी दृढनिश्चय केला, आणि तेंव्हा पासून मी हे कार्य करू लागलो.

कोण आहेत हे मेडिसीन बाबा ?

वयाच्या १२ व्या वर्षी मोटार अपघातामध्ये अपंगत्व आलेले ओंकारनाथ हे दररोज सुमारे ५ ते ६ किलो मिटर चालतात कारण त्यांना दिल्ली मेट्रो परवडत नाही. सकाळी ८ वाजता घरापासून त्यांचा प्रारंभ होतो . त्यानंतर ते त्यांच्या जेष्ठ नागरिकच्या पासचा वापर करून बसमधून प्रवास करतात. ते काही दुर्गम भागात हि चालत जातात जेथे त्यांना बससेवा मिळत नाही. दर माह ते ६ लाखांची औषधे गोळा करून गरिबांमध्ये विनामुल्य वाटतात.

याच बरोबर महाविद्यालय व मंदिरांसारख्या ठिकाणी औषध संग्रह बॉक्स ठेवले असल्याने समाजातील दयाळू व दानशूर लोक त्या बॉक्स मध्ये आवश्यक नसलेली परंतू योग्य समाप्ती तारिखेच्या आतली सगळी औषधे त्यामध्ये टाकतात. त्यानंतर त्या औषधांची त्यांच्या निर्मात्यांसहीत नावानिशी संग्रहित केली जावून आवश्यक त्या गरजूंपर्यंत पोहचवली जातात.

ओंकारनाथ हे त्यांची पत्नी, ४५ वर्षीय मानसिकदृष्ट्या अपंग मुलगा एका भाड्याच्या राहतात. इतक्या अडचणीत ही आपण समाजाचे काही देणे लागतो या विचाराने ओंकारनाथ हे विनामुल्य समाजकार्य करत आहेत यात त्यांना घरच्यांबरोबर एक मदतनीस देखील मदत करत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा