उस्मानाबाद, दि. २५ जुलै २०२०: कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर देखील उद्भवलेल्या समस्यांचे निवारण करण्यासाठी सर्व कर्मचारी, अधिकारी कार्यरत आहेत. अशा परिस्थितीत काल दिनांक २४ जुलै रोजी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी विविध ठिकाणांतील नागरिकांच्या समस्यांची पाहणी केली. तसेच, त्याचे तात्काळ निवारण करण्याच्या त्यांनी यापूर्वीच सुचना दिल्या आहेत.
शासकीय विश्रामगृह, उस्मानाबाद (शिंगोली) येथे राष्ट्रीय महामार्ग ३६१ च्या चालू असलेल्या कामाचा आणि तेथे उद्भवलेल्या समस्यांच्या संदर्भात आढावा बैठक घेतली.
तुळजापूर तालुक्यातील तडवळा येथे ऊस कारखान्यास घेऊन जाण्याची सोय करणे, काक्रंबा येथे अंडरग्राउंड बोगदा करणे. उस्मानाबाद तालुक्यातील भंडारी गावात जाण्यासाठी साईट रस्ता करणे, साईट नाली करणे, तसेच गावातील कै. केशव झांब्रे या शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे त्याच्या कुटूंबियांना आर्थिक मदत करण्यात यावी. औसा तालुक्यातील आशिव येथे टी पॉईंट करणे किंवा ओहर ब्रिज करणे, उजनी येथे करण्यात आलेल्या अपुऱ्या गटारांमुळे पावसाचे पाणी येथील लोकवस्तीतून जाऊन जवळ असलेल्या शेतीचे भरपूर नुकसान होत आहे. तेथे साईट नाली व रस्ता करण्यात यावा. अशा विविध सूचना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी काल दिनांक २४ जुलै रोजी दिल्या.
या बैठकीत शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ. कैलास घाडगे- पाटील, प्रोजेक्ट मॅनेजर श्री. राजू पाटील, श्री. कुलकर्णी, श्रीनिवास राव, रिटायर्ड तहसीलदार श्री. जाधव, जि. प.सदस्य बालाजी बंडगर, मुकुंद पाटील, तडवळा मोर्डो सरपंच राजाभाऊ शेंडगे, तसेच नागरिक , संबंधित अधिकारी आदीही उपस्थित होते.
न्यूजअनकट प्रतिनिधी: प्रगती कराड