इंदापूर, दि.१६ मे २०२०: इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाने तयार केलेले दहा लिटर सॅनीटायझर इंदापूर पोलीस स्टेशनला माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
महाविद्यालयातील रिसर्च लॅबरोटरी, रसायनशास्त्र विभाग तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून सॅनिटायझरचा तयार करण्यात आले आहे. विविध विभागातील प्रशासनास असणारी गरज लक्षात घेऊन सॅनिटायझरची निर्मिती करण्यात आली.
यावेळी हर्षवर्धन पाटील म्हणाले की, सॅनिटायझरची असणारी मोठ्या प्रमाणातील गरज लक्षात घेऊन इंदापूर महाविद्यालयाने इंदापूर पोलीस प्रशासनास सुरुवातीला दहा लिटर सॅनिटायझरचा पुरवठा केला असून प्रशासनास लागेल तेवढे सॅनिटायझर महाविद्यालयाकडून दिले जाईल.
यापूर्वी इंदापूर नगरपरिषदेस देखील सॅनिटायझरचा पुरवठा करण्यात आला. इंदापुर महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. संजय चाकणे, भिगवण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव वाळुंज, रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. रामदास ननवरे, डॉ. राजेंद्र भोसले तसेच डॉ. शिवाजी वीर,उपप्राचार्य नागनाथ ढवळे, प्रा. अशोक पाटील, प्रा.श्रीनिवास शिंदे, प्रा. धनंजय भोसले यावेळी उपस्थित होते.
न्युज अनकट प्रतिनिधी: योगेश कणसे
इंदापुरकरांनी काळजी पुर्वक कोरोणाला लांब ठेवले होते..पण सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आज मुंबई वरुन आलेल्या कोरोऩा पाँझीटिव्ह पेशंट मुळे इंदापुरकरांची झोप उडाली..योग्य नियोजन करुन …कडक अंमलबजावणी करुन या संकटातुन सुटका होईल …नाही तर खुपच बिकट परिस्थीती होणार आहे..नगरपालीका…आरोग्य विभागाने मिळुन काम करायला हवे कम्युनिकेशन जरुरीचे आहे