तिरंगा कॉलेज तर्फे, गड, किल्यांचे अभ्यासक मारुती गोळे यांचा सत्कार

बारामती, ५ फेब्रुवरी २०२१: गड, किल्यांचे अभ्यासक मारुती आबा गोळे व भारत पाटील पुणे इन्स्टिट्यूट ऑफ एव्हिएशन टेक्नॉलॉजीचे संस्थापक यांचा तिरंगा फाउंडेशनचे अध्यक्ष- रणजित शिंदे यांनी सत्कार केला.
यावेळी बोलताना मारुती गोळे म्हणाले, आजच्या युवा पिढीला आपल्या संस्कृतीची व इतिहासाची माहिती देणे आवश्यक आहे.

मुलांसाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नवनवीन संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न तिरंगा फाउंडेशन नेहमीच करते. विद्यार्थ्यांना सामाजिक व प्रेरणादायी उपक्रमात अग्रेसर अशी भूमिका असावी या सामाजिक जाणीवेने सतत युवा पिढीचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी तिरंगा फाउंडेशन आग्रही असते.

सामाजिक विचारांनी प्रेरित व राष्ट्रीय एकात्मता अबाधीत राहावी यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे तिरंगा कडुन आयोजन केले जाते. असे तिरंगा कॉलेजचे प्रमुख रणजित शिंदे यांनी सांगितले. यावेळी डायरेक्टर डॉ.पोपटराव मोहिते व प्रा. रवी तिकटे तसेच तिरंगा फौंडेशनच्या विविध संस्थेतील कर्मचारी उपस्थित होते.

न्युज अन कट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा