पुरंदर दि.१ ऑगस्ट २०२० : जगभरात कोरोनाचा कहर सुरू आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लोकांना एकत्र येण्यास शासनाने निर्बंध घातले आहेत. त्यामुळे अनेक सण – उत्सव साधेपणाने साजरे केले जात आहेत. त्याच बरोबर आज नीरा येथेही बकरी ईद अत्यंत साधेपणाने साजरी करण्यात येत आहे.
मुस्लिम बांधवांनी आज मशिदीमध्ये न येता. घरूनच नमाज अदा करीत. आपली सामाजिक बांधिलकी जपली. मुस्लिम धर्मातील उर्दू महिन्यातील शेवटचा महिना म्हणजे जिलहज. दरवर्षी जिलहजच्या १० तारखेला बकरी ईद साजरी केली जाते.
इस्लाम धर्मात बकरी ईदला फार महत्व आहे. बकरी ईद हा त्यांचा महत्वाचा सण आहे . म्हणूनच मुस्लिम बांधव मशिदीमध्ये एकत्र येत सामूहिक नमाज आदा करीत असतात. नीरा येथील मशिदीमध्ये सुमारे ८०० लोक नमाज आदा करीत असतात. नीरा ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाने या ठिकाणी एकत्र येत नमाज पठण न करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार आज केवळ ७ लोकांनी नीरा येथील मशिदीमध्ये नमाज आदा केली. तर इतरांनी घरीच नमाज आदा केली.
त्यामुळे आज बकरी ईद असूनही नीरा येथील मशिद बंद होती. याबाबत बोलताना नीरा ग्रामपंचायत सदस्य अनिल चव्हाण म्हणाले की, ग्रामपंचायत प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुस्लिम बांधवांनी आदर्श पद्धतीने बकरी ईद साजरी केली.येथून पुढे येणारे अनेक सण आपल्याला असेच साधेपणाने साजरे करावे लागणार आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी













































