नववर्षाच्या पहिल्याच दिवशी दिल्ली भूकंपाने हादरली !

नवी दिल्ली, १ जानेवारी २०२३ नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी दिल्ली आणि आसपासच्या परिसरात भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ३.८ रिश्टल स्केल एवढी होती. हा भूकंप पहाटे १ वाजून १९ मिनीटांनी झाला.

नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीकडून मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपाचे केंद्रबिंदू हरियाणातील झज्जर येथे होते. त्याची खोली जमिनीपासून ५ किलोमीटर खाली होती. मात्र, या धक्क्यांमुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. विशेष म्हणजे भूकंप झाला, तेव्हा लोक नववर्षाच्या जल्लोषात मग्न झाले होते. दरम्यान, गेल्या काही महिन्यांत दिल्लीत अनेकदा भूकंपाचे धक्के बसले आहेत.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा