उज्जैन, ६ जुलै २०२० : श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी आज सकाळी उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात
पुजा-यांकडून भस्म आरती करण्यात आली. शिव पिंडीवर दूध घालण्याचा विधी करतांना कोरोना विरूद्धच्या प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पुजा-यांनी मुखवटे घालून सामाजिक अंतर राखले.
मंदिरला आतून हार आणि गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवलेले होते. कोरोनाव्हायरसच्या प्रादुर्भावामुळे नेहमीची आसणारी भक्तांची गर्दी यावेळेस मंदिरात दिसलीच नाही. भक्तांच्या अनुपस्थितमुळे जगभरातील अनेक भक्तांचे जीवन प्रभावित झाल्याचे दिसून आले .
अमृतसरच्या भाईयान शिवालय मंदिरात, भाविक मास्क लावून व सामाजिक अंतर ठेवून आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करताना दिसले.
श्रावण हा हिंदू दिनदर्शिकेतील पाचवा महिना असून वर्षाचा सर्वात शुभ महिना मानला जातो. हा महिना भगवान शिव यांना समर्पित आहे जे हिंदू धार्मिक श्रद्धांनुसार या विश्वाचे निर्माता, संरक्षक आणि विनाशक आहेत.
वर्षभर भगवान शंकराची पूजा तर केली जाते, परंतू श्रावण महिन्यातील सोमवार अत्यंत महत्त्वपूर्ण आणि शुभ मानले जातात. उत्तर भारतीय राज्यांमध्ये हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.
‘श्रावण महिन्यातील दर सोमवारी भक्त विशेष असे श्रावणी सोमवार व्रत ठेवतात आणि शिव मंदिरांना भेट देतात.
न्यूज अनकट प्रतिनिधी