अभिनेता अतुल कुलकर्णी च्या वाढदिवसा निमित्त, त्याच्या चित्रपट सृष्टीतील प्रवासा विषयी

मुंबई, १० सप्टेंबर २०२२: कोणत्याही ओळखीची गरज लागत नाही, अशी काही नावंं असतात. अशाच काही नावांमध्ये, हरहुन्नरी अभिनेते अतुल कुलकर्णी यांचं नावं आवर्जुन घेतलं जातं. अतुल कुलकर्णी हे एक असं नाव आहे जे फक्त मराठी सिनेसृष्टीपुरतं मर्यादित नक्कीच नाही. अतुल यांची गणना उत्कृष्ट अभिनेते म्हणून केली जाते. आपल्या अभिनय कौशल्याने त्यांनी स्वतःचं वेगळं स्थान सिनेसृष्टीत निर्माण केलं आहे.

१० सप्टेंबर १९६५ रोजी कर्नाटकात जन्मलेल्या अतुल यांचा आज वाढदिवस आहे. हिंदी व्यतिरिक्त त्यांनी मराठी, मल्याळम, तमिळ, तेलगू, कन्नड आणि इंग्रजी सिनेमांमध्येही आपलं अभिनय कौशल्य दाखवलं.

अतुल कुलकर्णी यांनी सुरुवातीचे शिक्षण कर्नाटकातून केले. दहावीत असताना त्यांनी पहिल्यांदा अभिनयात हात आजमावला. त्यानंतर सोलापूर मधे कॉलेजच्या दिवसांतच त्यांनी रंगभूमीवर प्रवेश केला आणि अभिनयातील बारकावे शिकून घेतले. १९९५ मध्ये नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून डिप्लोमा केला.

१९९७ मध्ये कन्नड ‘भूमी गीता’मधून त्यांनी चित्रपटात पदार्पण केलं. २००० मध्ये ‘हे राम’ सिनेमात त कमल हसन सोबत दिसले. त्यानंतर २००१ मध्ये आलेल्या मधुर भांडारकर यांच्या ‘चांदनी बार’ सिनेमाने अतुल कुलकर्णी यांना अभिनेता म्हणून देशभरात ओळख मिळाली. या सिनेमातील त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं. अतुल कुलकर्णी यांना ‘चांदनी बार’ आणि ‘हे राम’साठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. यानंतर ते ‘रंग दे बसंती’, ‘पेज ३’, ‘द अटॅक ऑफ २६/११’, ‘दिल्ली ६’, ‘द गाझी अटॅक’, ‘थर्स्डे’ यासह अनेक भाषांच्या चित्रपटांमध्ये दिसले.
त्यांची अभिनयाची कारकीर्द अशीच बहरत जावो, हीच त्यांच्या वाढदिवसाची शुभेच्छा

न्युज अनकट प्रतिनिधी : गुरूराज पोरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा