अहमदाबाद २० जून २०२३ : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आपल्या तीन दिवसीय अमेरिका दौऱ्यासाठी रवाना झाले. तर दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज गुजरातमध्ये आहेत. आज ते विविध ठिकाणी भेटी देणार असुन आज जगन्नाथ रथ यात्रेनिमित्त अमित शाह यांनी जगन्नाथ मंदिरात आरती केली. ते आज गुजरात मध्ये विविध विकासकामाचेही उद्घाटन करणार आहेत.
अहमदाबादच्या जमालपूरमधल्या रथ यात्रेआधी त्यांनी जग्गनाथ मंदिरातील मंगला आरतीतही सहभाग घेतला.
ही रथ यात्रा देशातील दुसरी सर्वात मोठी रथ यात्रा मानली जाते. क्रेडाई गार्डनच्या सार्वजनिक पार्कचे देखील अमित शाह यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. ते आज दोन उद्यानांचे उद्घाटन करतील. रेल्वे फ्लायओव्हर आणि बावला भागातील त्रिमूर्ती हॉस्पिटलचेही अमित शाह भूमिपूजन करणार आहेत.
मागील काही दिवसापासून बिजरजॉय चक्रीवादळाने गुजरातमधील किनारी भागालगत हाहाकार माजवला आहे. या ठिकाणी हजारो कोटी रुपयांचे नुकसान झालय. हजारो घरांची पडझड झाली, तर शेकडो जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. व्यवसाय पूर्णतः ठप्प झाले होते, यानंतर गुजरात सरकारने ९८०० कोटीहुन अधिक मदतीची मागणी केंद्र सरकारकडे केलीय. आज अमित शहा गुजरात दौऱ्यावर आहेत या पार्श्वभूमीवर ते काही घोषणा करतात का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी- अनिल खळदकर