केरळ, ३१ ऑगस्ट २०२० : केरळसह जगभरातले केरळी नागरिक आज ओणमचा सण साजरा करत आहेत. केरळच्या शेजारी तामिळनाडू राज्याच्या कन्याकुमारीमध्ये ओणम मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो.
राजा मावेली अर्थात महाबलीचं स्वागत करण्यासाठी सर्वत्र फुलांच्या रांगोळ्या काढल्या जातात. केळ्याचे विविध पदार्थही केले जातात. यावर्षी ओणमचे सार्वजनिक कार्यक्रम तसंच पद्मनाभस्वामी मंदिर आणि राजवाड्यातले कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
घराघरातून मात्र ओणमसाठी नेहमचाच उत्साह आहे. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांनी सर्वांना ओणमच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी