कर्जत, दि. १० जुलै २०२०: कर्जत तालुक्याचे ग्रामदैवत श्री संत गोदड महाराज यांची १६ जुलै रोजी होणारी रथ याञा कर्जत प्रशासनाने कोरोना च्या पार्श्वभूमीवर रद्द केली आहे. पंचक्रोशीतील अत्यंत महत्त्वाचे देवस्थान म्हणून संत गोदड महाराज मंदिराकडे पाहीले जाते. सालाबाद प्रमाणे होणारी रथ याञा ही कोरोना च्या प्रभावामुळे रद्द करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे की कर्जत मधील संत गोदड महाराज यांची दीडशे वर्षांपूर्वी पासुन चालत असलेली रथ याञा कर्जत प्रशासनाने रद्द केली आहे. या वर एक प्रमुख व्यक्तीचे पथक हे ड्युप्टी कलेक्टर अर्चना नाष्टे यांच्या कडे गेले होते. पथकाने २० लोकांना रथ याञा काढण्याची ही विनंती केली होती. सामाजिक अंतर ठेवून ही रथ याञा काढू असे सांगून ही या विषयावर चर्चा करत असताना नाष्टे यांनी ही रथ याञा कोणत्याही परिस्थितीमध्ये होनार नसल्याचे स्पष्ट पणे सांगीतले.
या विषयावर कारण देत सध्या परिस्थिती वर कोरोनाचा विचार करून हा निर्णय जाहीर केला असल्याचे त्यांनी सांगितले आहे.जिल्हा अधिकारी द्विवेदी यांचा आदेश आहे की, कोणतीही याञा किंवा धार्मिक कार्यक्रम जिल्हात होणार नाही. या मुळे रथ याञेस परवानगी नाकारली आहे. असे नाष्टे यांनी सांगितले आहे.
या वेळी बैठकीत उपनगराध्यक्ष नामदेव राऊत नगरसेवक घुले, पुजारी, आणि रथ याञेतील महत्वाचे मान्यव, प्रशासनानेचे अधिकारी उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष