विद्युत जल पंप वायर चोरी प्रकरणी एकास अटक

कर्जत, दि. २३ जून २०२० : शेतकऱ्यांच्या विद्युत जल पंप चोरून नेऊन त्यांच्या मधील वायरची विक्री करणाऱ्या टोळी मधील अक्षय हनुमान काटकर यांस काल २२ जून रोजी कर्जत पोलिसांनी अटक केली.

या बाबतीत पोलिस सुत्रानुसार मिळालेली माहिती अशी की, कर्जत तालुक्यातील बागायत पट्ट्या मधील दुधवडी, भांबोरा, खेड, शिपोरा, यासह विविध भागातून शेतकऱ्यांच्या विद्युत जल पंप मोठ्या प्रमाणात चोरल्यांच्या घटना सातत्याने घडत आहेत. या मुळे शेतकरी त्रस्त झाले होते.

या पार्श्वभूमीवर पोलिसांकडे तक्रार प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव आणि पोलिस निरीक्षक सुनिल गायकवाड यांनी या चोरांना पकडण्यासाठी एक पथक तयार केले होते.

या पथकामध्ये सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश माने,भाऊसाहेब यमगर, पांडूरंग वीर,सागर म्हैत्रेे, गिरीश पुंड, यांच्यासह काही कर्मचा-यांचा समावेश होता. या पथकाने टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी सापळा रचला होता. २२ जून रोजी या टोळी मधील अक्षय हनुमान काटकर हा आरोपी बारामती कडे जात असल्याची माहिती पोलिस पथकाला मिळाली.

या नंतर त्यांनी खेड येथील चेकपोस्टवर जाऊन सापळा रचला बारामतीकडे जाण्यासाठी अक्षय हनुमान काटकर आला असता त्याला पोलिसांनी अलगदपणे अटक केली. या प्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली आहे. यामुळे या टोळीचा पर्दाफाश होण्यास मदत होणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा