झारखंड, ८ ऑगस्ट २०२०: मित्रानों हल्ली लग्न करणं हि फार सोपी गोष्ट होऊन बसली आहे. म्हणजे पुर्वी लग्नासाठी मुलीच्या घरी जाणे कांदे पोह्याचे कार्यक्रम होणे त्या नंतर मग पसंत पडणे किंवा नापसंत होणे. अशा अनेक घटना घडायच्या हळूहळू काळानुरुप त्यात बदल होता गेला आणि मुलगी बघण्याच्या कांदे पोह्याची जागा आधुनिक यंत्र अर्थात मोबाईल, इंटरनेट आणि काही वेबसाईट्स ने घेतली. ज्यामुळे लग्न ही सोयीस्कर पणे, होऊ तर लागली पण त्या प्रमाणेच यामधून मोठमोठे घोटाळे देखील होऊ लागले.अशीच एक घटना घडली झारखंड मध्ये
झारखंडच्या इटखोरी येथील एका तरुणीने शादी.काॅमवर तीन तरुणांसोबत ती बिनलग्नाची आसल्याचे सांगत लग्न करुन फ्राॅड केले. बसला ना धक्का.. अहो फक्त लग्नच नाही केले तर तिने या तिघांकडून मोठ्या प्रमणात पैसे देखील उकळले. या भामट्या नवरीने २०१५ ला निलय कुमार सोबत लग्न केले आणि १ कोटीला चुना लावला. काही कालावधीतच तीने गुजरातमधील अमित गुप्ता नामक तरुणाशी लग्न केले आणि त्याच्या कडून ४० ते ४५ लाख उकळले आणि २०१८ साली पुण्यातील सुमित पवार नामक मुलाबरोबर ती लग्न करुन अमेरिकेत गेली तिथे सुमितच्या आईने चालाकीने हि सर्व माहिती काढत तिचा भांडाफोड केला.
त्यामुळे मित्रांनो लग्न जर कुठल्या वेबसाईटद्वारे ओळखीने करत असाल तर त्या आधी समोरील कोणत्याही व्यक्तीवर विश्वास ठेवण्यापेक्षा त्याला ओळखा त्यासाठी वेळ घ्या त्याची संपुर्ण माहिती काढा आणि मगच त्या व्यक्तीला आपल्या आयुषाचा साथीदार म्हणून नेमणुक करा.
न्यूज अनकट प्रतिनिधी













































