वडवणीत मजुरांना एक हात मदतीचा

बीड : कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सर्व देशात लॉकडाउन करण्यात आले आहे. त्यामुळे हातावर पोट भरणाऱ्या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे या मजुरांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. बीड जिल्ह्यातील वडवणी गावातील नागरीकांची गरज लक्षात घेऊन भारतीय जनता पार्टी वडवणी नगराध्यक्ष बाबरी मुंडे व बाबरीशेठ मुंडे मित्र परिवार वडवणी यांच्या वतीने वडवणीमध्ये १५०० कुटुंबाना मोफत घरपोच राशन वाटप करण्यात आले. त्यांना एक हात मदतीचा देण्यात आला.

या किटमध्ये त्यांनी गहू, तांदूळ, तुरडाळ, मुगडाळ, पोहे, तेल, तिखट, मीठ यांचा समावेश होता. एक हात मदतीचा या वाक्यांचा वापर करत गरजवंताना इथून पुढे देखील मदत केली जाईल असे भारतीय जनता पार्टी वडवणी नगराध्यक्ष बाबरी मुंडे म्हणाले.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा