पुरंदर तालुक्यातील दौंडज खिंडित ट्रक व कंटेनर मध्ये भीषण अपघात, एकाचा मृत्यू

पुरंदर, १६ डिसेंबर २०२०: पुरंदर तालुक्यातील पुणे पंढरपूर मार्गावर दौंडज खिंडी जवळ ट्रक आणि कंटेनर यांच्यामध्ये आज रात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे तर कंटेनर चालक गंभीर जखमी झाला आहे.

याबाबत जेजुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आज रात्री पहाटे दोन वाजल्याच्या सुमारास कंटेनर व ट्रक यांच्या मध्ये भीषण अपघात झाला आहे. यामध्ये ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला असून कंटेनर चालक गंभीर जखमी झाला आहे. याबाबत अनिकेत लक्ष्मण इंगुळकर रा. मुंडवा केशवनगर पुणे यांनी वाल्हे औट पोस्ट मध्ये तक्रार दिली आहे.

त्यानुसार आज रात्री दोन बाजलेच्या सुमारास दौंडज खिंडीजवळ असलेल्या कदमवस्ती नजिक त्यांचा भाऊ चालवत असलेला ट्रक एम एच १२ क्यू जे २६५३ निरेकडं जात होता. यावेळी निरेकडून येणारा कंटेनर एम एच १२ एल टी ७८९१ या कंटेनरनं त्यांच्या ट्रकला जोरदार धडक दिली. यामध्ये ट्रक चालकाचा मृत्यू झाला.

याप्रकरणी कंटेनर चालक सिद्धेश्वर बरुआन दहिफळे रा. खडुसार गाव, यांच्यावर हयगयनं कंटेनर चालवून ट्रकचालकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेचा तपास जेजुरी पोलीसकरीत आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा