माढा, दि. १९ऑगस्ट २०२०: गेल्या पंधरा दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत सोलापूर येथील इनामदार हॉस्पिटल मध्ये ऍडमिट असणाऱ्या कृषी पदवीधर युवकाच्या मदतीला कृषी पदवीधर युवाशक्ती संघटना मैदानात उतरली. गणेश जाधव हा युवक शेतात काम करत असताना सर्प दंश झाला होता. गणेश जाधव हा कृषी पदवीधर मृत्यूच्या दाढेत गेला त्याच्यावर उपचार चालू झाले. परंतु त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे त्याच्या कुटुंबीयांवर संकटाचा डोंगर कोसळला होता.
युवाशक्ती परिवाराने त्यांना हतबल होऊ दिले नाही
याप्रसंगी माढातालुका अध्यक्ष शुभम लोकरे,करमाळ्याचे तालुकाध्यक्ष रोहित माने व इंदापूरचे तालुका अध्यक्ष वैभव पाटील यांनी सामाजिक बांधिलकी जपत कृषी पदवीधराला या आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी मोहीम उघडली. याला राज्यभरातील कृषी पदवीधरांनी समर्थन देत अवघ्या दोन दिवसांत एक लाख रुपये इतका धनादेश गोळा केला. संघटनेने दिलेल्या हाकेला राज्यभरातून साथ मिळाली हा कृषी पदवीधरांचा संघटनेवर असलेला विश्वास आहे. हा संपूर्ण धनादेश आज कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेचे अध्यक्ष जयदीप ननवरे, कार्याध्यक्ष प्रवीण आजबे यांच्या उपस्थितीत गणेश जाधव यांच्या कुटुंबीयांकडे सोपवण्यात आला.
तसेच गणेश जाधव कुटुंबियांना मानसिक धीर देण्यात आला व महाराष्ट्रातील संपूर्ण अग्रिकॉस परिवार कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेच्या मार्फत गणेश जाधव यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, याची जाणीव यावेळी करून देण्यात आली. लवकरच सर्वांच्या आशिर्वादाने आपला कृषी मित्र गणेश जाधव हा बरा होईल व पुन्हा त्याच जोमाने त्यात जोशाने आणि नव्या उमेदीने काळ्याआईच्या सेवेत पुन्हा रुजू होईल अशा शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी अध्यक्ष जयदीप ननावरे, कार्याध्यक्ष प्रवीण आसबे, माढा तालुका अध्यक्ष शुभम लोकरे, इंदापूर तालुका अध्यक्ष वैभव पाटील, करमाळा तालुका अध्यक्ष रोहित माने, युवाशक्ती परिवारातील आदित्य पाटणकर, रंजीत गंभीरे, रंजीत कदम, गिरीश बनकर व किरण जाधव हे उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील