उस्मानाबाद २७ जुलै २०२० : उस्मानाबाद सत्र न्यायालय -१ येथे आज दिनांक २७ जुलै रोजी येरमाळा पोलीस ठाण्यातील गु.र.क्र. १५०/२०१७ या भा.दं.सं. कलम -३०२, २०१ , १२०(ब) , १७६ , ३४ , नुसार दाखल गुन्ह्याची सुनावणी झाली.
संबंधित गुन्ह्यातील प्रथम आरोपी संजय दिलीपराव मडके, वय वर्ष २८ हा कळंब तालुक्यातील मोहा या गावातील रहिवासी आहे. या आरोपीस मा. न्यायालयाने खून केल्याबद्दल भा. दं.सं.कलम ३०२ अन्वये जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच, १०००/-रूपये दंड आणि यासोबतच खुनाचा पुरावा नष्ट केल्याप्रकरणी भा. दं. सं. कलम २०१ अन्वये ३ वर्षे सक्त मजुरीची शिक्षा आणि ५००/- रूपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.
या गुन्ह्यात सहभागी असणारा दूसरा आरोपी सुदर्शन बिभीषण मडके वयवर्ष २५ , हा असून त्याला चांगल्या वर्तणुकीची हमी देणाऱ्या रुपये १५०००/-च्या बंधपत्रावर मुक्त करण्यात आलेले आहे.
न्यूजअनकट प्रतिनिधी: प्रगती कराड