कुपवाडामध्ये शस्त्रास्त्रांसह एक व्यक्ती ताब्यात

श्रीनगर, १७ ऑक्टोबर २०२२: जम्मू-काश्मीरमधील पोलीस आणि लष्कराने सोमवारी कुपवाडा जिल्ह्यातील कर्नाह भागात एका संशयिताला अटक केली आहे. त्याच्या घराची झडती घेतली असता दोन पिस्तुल मॅगझिन, ११ राउंड आणि दोन जिवंत ग्रेनेड सापडले.

मिळालेल्या माहितीनुसार, ASI मुनीर अहमद यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथक आणि स्थानिक लष्कराच्या तुकडीने अली अक्सर शेख यांचा मुलगा मोहम्मद शफी शेख याच्या हाजित्रा कर्नाहच्या घराची झडती घेतली. यावेळी शफीने चौकशीत कबूल केले की त्याने अनेक शस्त्रे आणि दारूगोळा त्याच्या घरी एका शिलाई मशीनमध्ये लपवून ठेवले होते. यामध्ये दोन पिस्तूल अकरा राउंड आणि दोन जिवंत ग्रेनेड जप्त करण्यात आली असून शफीला ताब्यात घेण्यात आले आहे.

या घटनेबाबत गुन्हा दाखल करताना पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, शफीला यापूर्वीही अशा प्रकरणात अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध न्यायालयात खटला सुरू आहे. यापूर्वी २०२१ मध्ये शेखविरुद्ध शस्त्रास्त्र जप्तीप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा