केडीएमसीत गणेशोत्सवासाठी ‘एक खिडकी योजना’

कल्याण, दि. ७ ऑगस्ट २०२०: गणेश चतूर्थीला अवघे 15 दिवस राहिले आहेत. प्रत्येक घरात आणि सार्वजनिक मंडळांमध्ये वेगळीच लगबग सुरू झाली आहे. लहांनापासून मोठ्यांपर्यत सर्वजण बाप्पाच्या आगमनाची तयारी करत आहेत. यंदाचा गणेशोत्सव हा आदर्श गणेशोत्सव म्हणून साजरा करण्याचे आवाहन केडीएमसी महापालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी दिलेत.

सार्वजनिक गणेशोत्सवाच्या परवानगीसाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात “एक खिडकी योजना” राबविण्यात येणार आहे. त्याठिकाणी महापालिकेचे कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तर महापालिकेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार गणेशोत्सव मंडळांनी परवानगीसाठी 12ऑगस्टपर्यंत अर्ज करणे बंधनकारक असल्याचेही पालिका आयुक्त डॉ. सुर्यवंशी यांनी सांगितले. तसेच केडीएमसी कडून मार्गदर्शक सूचनाही देण्यात आल्या आहेत.

त्यानूसार सार्वजनिक मंडळांकरीता गणेशमूर्ती 4 फुट आणि घरगुती गणेशाची मुर्ती 2 फुटांची असावी.आणि त्या अनुषंगाने मंडपांचा आकारही लहान असावा. शासनाच्या सूचनांनुसार गणेश मंडपांमध्ये निर्जंतूकीकरणाची, थर्मल स्क्रीनींगची व्यवस्था करण्यात यावी. मास्क परिधान करणे बंधनकारक करावे. मंडपामध्ये आरोग्य विषयक कार्यक्रम घेण्यात यावेत, सार्वजनिक मंडळांनी गणेश दर्शनासाठी  फेसबुक, केबल नेटवर्कद्वारे सुविधा उपलब्ध करुन दयावी. त्यामुळे योग्य नियमांचे पालन करूनच सण साजरा करावा असे आवाहन आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी :  राजश्री वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा