गोल पोस्ट इतर शुभेच्छा महाराष्ट्र राज्य औद्योगिक उत्पादन निर्देशांक वेब पोर्टल’चं अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाईन...

महाराष्ट्र राज्य औद्योगिक उत्पादन निर्देशांक वेब पोर्टल’चं अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन

मुंबई, ३० एप्रिल २०२१: नियोजन विभागाच्या अर्थ व सांख्यिकी महासंचालनालय व उद्योग विभागाच्या उद्योग संचालनालयाच्या वतीनं तयार करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र राज्य औद्योगिक उत्पादन निर्देशांक वेब पोर्टल’चं काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन करण्यात आलं. महाराष्ट्र राज्य औद्योगिक उत्पादन निर्देशांकच्या माध्यमातून राज्यातल्या औद्योगिक क्षेत्राच्या वाढीचा कल लक्षात येईल. राज्याच्या अर्थचक्राला गती देण्यासाठी राज्याचे उद्योग धोरण ठरवून ते प्रभावीपणे राबवण्यासाठी तसेच धोरणांचा नियमित आढावा घेण्यासाठी हे वेबपोर्टल उपयोगी ठरणार आहे.

राज्यातील कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्यात ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत निर्बंध लावण्यात आले आहेत. या कालावधीत सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी राज्य सरकारनं साडे पाच हजार कोटी रुपयांच्या मदतीचे पॅकेज दिले आहे. उद्योग क्षेत्र हे देशाच्या सकल उत्पन्नात महत्त्वाची भूमिका बजावणारे, सर्वाधिक रोजगार निर्मितीचे क्षेत्र आहे. औद्योगिक उत्पादन निर्देशांक राज्याच्या भौगोलिक क्षेत्रातील औद्योगिक प्रगतीचे मापन करणारे महत्त्वाचे साधन आहे. राष्ट्रीय, राज्यस्तरीय उत्पन्न काढताना निर्देशांकाचा उपयोग होतो.

या निर्देशांकाचा उपयोग करुन आपण राज्यासाठी प्रभावी धोरण आखू आणि राबवू शकणार आहोत. त्याचप्रमाणे आपल्या धोरणांचा आपल्याला नियमित आढावा घेता येणार आहे. याचा उपयोग शासनाबरोबरच उद्योग आणि या क्षेत्रातील संशोधन तसंच उत्पादन करणाऱ्या संस्थांना होणार आहे, असे अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

error: Content is protected !!
Exit mobile version