ऑनलाईन औषध विक्री बंदीसाठी सीएपीडी ने केले निवेदन

पुणे: ऑनलाईन औषध विक्रीवर कोर्टाने याआधीच बंदी आणलेली आहे परंतु तरीही सर्रास ऑनलाईन औषधे विकली जात आहे. याबाबत औषध विक्रेत्यांनीही प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रार केली होती. औषधांची ऑनलाईन विक्री होत आहे याची जाणीव सरकारला वेळोवेळी करून देण्यात आली होती. परंतु तरीही ही विक्री न थांबल्याने औषधांची ऑनलाइन विक्री तातडीने थांबविण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी ‘केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्‍ट’ने (सीएपीडी) अन्न व औषध प्रशासनाकडे केली आहे.

हाय कोर्टाने हे ऑनलाईन औषधे विकण्यावर बंदी आणली होती परंतु त्यानंतरही सातत्याने होत असलेल्या ऑनलाइन औषधांच्या विक्रीमुळे सीएपीडी’चे अध्यक्ष सुशील शहा, सचिव अनिल बेलकर यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या पुणे विभागाचे सहआयुक्त एस. बी. पाटील यांना ऑनलाईन औषध विक्री साठी कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन दिले. राज्यात पुण्या-मुंबईसह इतर शहरांमध्ये औषधांची ऑनलाइन विक्री सर्रास सुरू आहे. ती थांबविण्यासाठी तातडीने पावले उचलावीत. शहरात होणाऱ्या औषधांच्या ऑनलाइन विक्रीबाबतची माहिती प्रशासनाला आहे. याबाबत वेळोवेळी प्रशासनाला पुरावेही दिले आहेत. प्रत्यक्षात या विक्रीवर कारवाई केली जात नसल्याचे दिसून येते आहे. यामुळे औषधविक्रेत्यांत नाराजीची भावना आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा